ग्रामसेवक
निवडीसाठी कार्यपद्धती
महाराष्ट्रामधील लोकसंख्येच्या प्रमाणात खेडेगांवानुसार ग्रामसेवकांची आवश्यकता आहे. ग्रामसेवक भरती आवश्यकता व नियमानुसार केली जाते. ही भरती जिल्हापरिषदे मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात होते. त्याकरिता वृत्तपत्रात जाहिरात ही प्रसिध्द केली जाते व स्थानिक सेवायोजन कार्यालयातून उमेदवारांच्या नावांची यादी घेतली जाते. आपल्यामध्ये उत्साह, उमेद, आहे. आपल्याला महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची सेवा करायची तर मग चला.
शैक्षणिक अर्हता
महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ अन्वये प्रचलित सेवाभरती नियमानुसार विहीत केल्याप्रमाणे अर्हता
(एक) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता आणि कृषि विषयाची पदविका (दोन वर्षांचा अभ्यासक्रम)
(दोन) कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणा-या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
मानधन
ग्राम सेवक म्हणून नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना दरमहा रूपये २,५००/- मानधन दिले जाते.
व दरमहा रूपये १००/- प्रवास भ-ता दिला जातो.
नियुक्तीचा कालावधी
ग्रामसेवकाच्या नियुक्ती कंत्राटी पध्दतीवर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यांत येईल.
अकरा महिन्यानंतर नेमणुक आपोआप संपुष्टात येते.
ज्या उमेदवाराची कामगिरी समाधानकारक असेल त्यांना पुन्हा अकरा महिन्यांसाठी कंत्राटावर नेमण्यांत येते.
ज्या उमेदवाराची सेवा समाधानकारक नसेल त्यांची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यांत येते.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल मर्यादा ३३ वर्षे अशी राहील.
तसेच मागास वर्गीयांसाठी ती ५ वर्षे शिथिलक्षम राहील.
शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहीत करील अशी वयोमर्यादा ग्रामसेवकांना आपोआप लागू होईल.
अर्जाचा नमुना
ग्रामसेवक पदासाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते.
तुम्ही वर्तमान पत्रामध्ये जाहिरातीचा जो नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये व दिलेल्या विहित वेळेत नियुक्ती अधिका-यांकडे अर्ज सादर करावा.
अर्जासोबत काही कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल तर ती कागदपत्रे तुम्ही अर्जास जोडावीत.
अर्जातील प्रत्येक रकान्यातील माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सादर करावा.
निवडीसाठी कार्यपद्धती
कंत्राटी ग्रामसेवक भरती दरवर्षी जुलै महिन्यात होते. याकरिता संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी त्यांच्या आस्थापनेवर जेवढे ग्रामसेवक नियुक्त करावयाचे आहेत त्यांची मागासवर्गीयांच्या आरक्षणासह इतर सर्व प्राधान्य व आरक्षण विचारात घेऊन पदांची संख्या निश्चित करतात.
निवड समितीच्या सदस्य सचिव या पदांच्या संख्येनुसार जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) यांच्या कार्यालयाकडुन पात्र उमेदवारांच्या यादीसाठी सेवाभरती नियमासह मागणीपत्र पाठवितात. त्याचप्रमाणे स्थानिक प्रसिध्दी माध्यमाव्दारे जाहिरात करून उमेदवारांचे अर्ज स्विकारले जातात. या यादीसोबत व अर्जासोबत उमेदवारांच्या शालांत परिक्षा मंडळाचे एसएससी आणि एचएससी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, कृषि विषयाच्या पदविकेचे गुणपत्रक पाठविण्यास कळविले जाते. या कार्यालयाकडुन उमेदवारांचे गुणपत्रके प्राप्त होवू शकत नसल्यास प्राप्त झालेल्या यादीतील उमेदवारांकडुन गुणपत्रिकांच्या प्रमाणित प्रती मागविण्यात येतात.
उपरोक्त कार्यालयाकडुन उमेदवाराच्या त्यांनी कृषि पदविका परिक्षेमध्ये तसेच एचएससी(१२वी) व एसएससी(१०वी) परिक्षेत मिळविलेल्या गुणांसह याद्या प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना कृषि विद्यापीठाच्या कृषि विषयातील २ वर्षाच्या पदविकेच्या लेखी परिक्षेतील मिळालेले गुण विचारात घेवुन गुणानुक्रमे निवड यादी तयार करण्यात येते.
कृषि पदविकेतील लेखी परिक्षेत एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास एचएससी परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रम ठरविण्यात येते. एचएससी(१२वी) परिक्षेतील गुण समान असल्यास एसएससी(१०वी) परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रम ठरविण्यात येते. (ज्यांचे वय अधिक असेल त्याला वरचा क्रम द्यावा.)
वरीलप्रमाणे तयार केलेल्या याद्या विचारात घेवून जेवढ्या उमेदवारांना नियुक्त्या द्यावयाच्या असतील त्याच्या दीडपट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येते.
या मुलाखती औपचारिक स्वरुपाच्या असतील त्याद्वारे उमेदवारांचे फक्त व्यक्तीमत्व पाहिले जाते. औपचारिक मुलाखतीला कोणतेही गुण देण्यात येत नाही. उमेदवारांची निवड ही त्यांनी कृषि पदविका परिक्षेत मिळविलेल्या गुणांवरच अवलंबुन असते.
उमेदवारांच्या गुणानुक्रमे तयार केलेल्या यादीनुसार रिक्त पदांची संख्या लक्षात घेवुन निवड सुची तयार करण्यात येते. एकुण रिक्त पदांच्या दहा टक्के उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात येते. या निवड सुचीला व प्रतिक्षा यादीला सर्व सदस्यांची मान्यता घेतले जाते. व ती नियुक्ती प्राधिका-यांकडे त्यांनी केलेल्या मागणीनुसार उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी पाठविण्यात येते. त्याचप्रमाणे ही निवडसुची उमेदवाराच्या लेखी परिक्षेतील गुणांसह संबंधित कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येते. संबंधित उमेदवारांकडुन अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे जोडपत्र क प्रमाणे करारपत्र लिहुन घेतले जाते. तसेच उमेदवाराने सुरक्षा ठेव रक्कम भरल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात येते. नियुक्ती पत्राचा नमुना जोडपत्र ब मध्ये देण्यात आला आहे. त्या नमुन्यात विहीत केल्याप्रमाणे नियुक्तीपत्र देण्यात येते. ७अ. समितीने निवड केलेल्या उमेदवारांची निवडयादी १ वर्षापर्यंत ग्राह्य धरण्यात येते.
पदांसाठी आरक्षण
शासकीय कर्मचारी भरतीसाठी विविध संवर्गातील शासनाने विहित केलेली (अपंग व्यक्तींसाठी ३ टक्के आरक्षणासह माजी सैनिक ५ टक्के, महिला ३० टक्के, आणि प्रकल्पग्रस्त ३ टक्के, भूकंपग्रस्त २ टक्के इ.) सर्व समांतर आरक्षणे या भरतीसाठी आवश्यक असतात.
पाच वर्षानंतर नियमित पदावर नियमित वेतनश्रेणीत सामावून घ्यावयाचे असल्यामुळे या पदासाठी आरक्षण निश्चित करतांना नियमित स्वरुपात भरलेली पदे व कंत्राटी पद्धतीने भरावयाची पदे यांचा एकत्रित विचार करुन मागासवर्गीयांसाठी आरक्षण निश्चित केले जाते .
तलाठी (गट- क)
जिल्हा निवड समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात.
शैक्षणिक अर्हता ः तलाठी
पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. संगणक/ माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा ः तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील.
पदभरतीचा कार्यक्रम ः जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 40 ते 50 दिवसांचा असतो. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो. तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
परीक्षेचा दर्जा ः शासनाच्या तरतुदीनुसार ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील; परंतु, मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) दर्जाच्या समान राहील.
अभ्यासक्रम ः
तलाठी पदाच्या परीक्षेला 1) मराठी, 2) इंग्रजी, 3) सामान्यज्ञान व 4) बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण असून, एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
परीक्षेचे स्वरूप ः तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. त्यासाठी 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असेल.
अभ्यास घटक ः या परीक्षेसाठी जे चार अभ्यासघटक दिलेले आहेत, त्यावर 1) मराठी- 25 प्रश्न, 2) इंग्रजी- 25 प्रश्न, 3) सामान्यज्ञान- 25 प्रश्न, 4) बौद्धिक चाचणी- 25 प्रश्न याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.
परीक्षेची तयारी ः या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना बौद्धिक चाचणी व इंग्रजी हे घटक अवघड वाटतात; परंतु या घटकातील प्रश्नांचा रोज सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात. गुणवत्ता यादीत स्थान पटकावयाचे असेल, तर चारही अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत, हे लक्षात असू द्या. सामान्यज्ञान या अभ्यासघटकाची व्याप्ती देखील भरपूर आहे, याची जाणीव सतत असू द्या.

महाराष्ट्राचा
भूगोल, महाराष्ट्रविषयक सामान्यज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश यात आहे. म्हणूनच या परीक्षेची
पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment